वृद्ध साहित्यिक व कलावंतांनी मानधन योजनेयासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सातारा (जिमाका) : साहित्य व कला क्षेत्रात ज्यांनी मोलाची भर घातली आहे तसेच कला वाड्.मय क्षेत्रात ज्यांनी 15 ते 20 वर्षे इतक्या प्रदीर्घ काळासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे, अशा व्यक्तींना पर्यटन व सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून मानधन योजना राबविण्यात येत आहे. इच्छुकांनी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण अधिकारी सपना घोळवे यांनी केले आहे.
विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह गट विकास अधिकारी, पंचायत समिती यांच्यामार्फत समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्याकडे सादर करावीत. अधिक माहितीसाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण कार्यालयाशी किंवा 02162-228764 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

No comments