Breaking News

अतिवृष्टी व पूरग्रस्त, नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात फलटण करांची नेहमीच आघाडी : श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर

चिपळूणकडे रवाना होण्यापूर्वी टेम्पो समवेत श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व अन्य मान्यवर.

Phaltankar always in the forefront in helping flood victims, natural calamities: Shrimant Ramraje Naik Nimbalkar

     फलटण  : अतिवृष्टी व पूरग्रस्त किंवा अन्य नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात फलटण करांनी नेहमीच आघाडी घेतली असून चौधरवाडी ग्रामस्थांनी तीच भूमिका निभावली असल्याचे नमूद करीत महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी चौधरवाडी ग्रामस्थांना धन्यवाद दिले.

    समस्त चौधरवाडी ग्रामस्थ व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचारमंच यांचे माध्यमातून कोकण पूरग्रस्तांसाठी जमा करण्यात आलेल्या मदतीचा टेम्पो श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस या येथील निवासस्थानी श्रीफळ वाढवून चिपळूणकडे रवाना करण्यात आला. यामध्ये ४५० किट असून प्रत्येक किटमध्ये ५ किलो गहु, ५ किलो साखर, एक साडी व अन्य जीवनावश्यक वस्तू असल्याचे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचारमंच चौधरवाडीचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे यांनी निदर्शनास आणून दिले.

    श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांचे प्रमुख उपस्थितीत डॉ. नितीन सावंत, लोणंद यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. यावेळी नितीनभैय्या भोसले, नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले शैक्षणिक व सामाजिक विचारमंचचे अध्यक्ष तुकाराम कोकाटे, चौधरवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.

No comments