Breaking News

निर्बंधांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सुर्यकांत दोशी यांच्यावर गुन्हा दाखल

A case has been registered against Suryakant Doshi for violating the restrictions

    फलटण (प्रतिनिधी) - फलटण तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता सर्वाधिक रुग्ण फलटण शहरासह गुणवरे, निंबळक, बरड, पिंप्रद या भागात आढळून येत आहेत. प्रशासनाकडून शनिवारी व रविवारी संचार बंदी व कडक लॉकडाऊन चे आदेश असतानाही पिंप्रद या गावातील राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित गुरुकुल या ठिकाणी शनिवारी दिनांक ७ जुलै रोजी जैन सोशल ग्रुप फलटणचे वतीने डॉ. श्री. सुर्यकांत शांतीलाल दोशी यांनी त्यांचे कार्यकारिणीचा शपथविधी समारोह मोठ्या प्रमाणावर लोक गोळा करून हा सोहळा पार पडला. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ७ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी १०.०० वा चे सुमारास राष्ट्रबंधू राजीवजी दिक्षीत गुरुकल पिंप्रद ता. फलटण येथे जैन सोशल ग्रुप फलटणचे वतीने डॉ. श्री. सुर्यकांत शांतीलाल दोशी यांनी त्यांचे कार्यकारिणीचा शपथविधी समारोह संपन्न झाला. सदर कार्यक्रमात सदर ग्रुपचे अध्यक्ष व सदस्य मिळून ३५ ते ४० लोक उपस्थित होते. तरी त्यांनी सदर कार्यक्रमासाठी कोणतीही लेखी अथवा तोंडी परवानगी घेतली नाही. तसेच सदर कार्यक्रमास लोकांची गर्दी बेकायदेशीर जमा करून सार्वजनिक ठिकाणी विषणू संसर्ग व त्याचा प्रादूर्भाव पसरवून व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात घालून मा.जिल्हाधिकारी सो सातारा यांचेकडील आदेशाचा भंग करून कोरोना १९ संसर्ग साथीचा रोग पसरवू शकतो हे माहीत असताना मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

अधिक तपास पोलीस नाईक धराडे हे करीत आहेत.

No comments