नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्या आडमुठेपणाला कंटाळुन सत्ताधारी नगरसेवकांची सभेला गैरहजेरी - अशोकराव जाधव
Absence from meeting of ruling corporators due to stubbornness of corporator Pandurang Gunjwate - Ashokrao Jadhav
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि १० ऑगस्ट - फलटण नगरपालिकेची जनरल बोर्डाची मिटिंग आयोजित केली होती. त्यामध्ये एकुण पाच विषय घेतले गेले होते. विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व गटनेते अशोकराव जाधव व विरोधी नगरसेवकांनी चार उपसूचना मांडल्या. वास्तविक पाहता विरोधकांच्या या उपसूचना सत्ताधार्यांच्या कडून मंजूर केल्या जात नाहीत. परंतु फलटणमधील एका नगरसेवकाच्या कारभाराला कंटाळून अशा आडमुठी माजी नगराध्यक्षाला धक्का देण्यासाठी सत्ताधारी पार्टीचे नगरसेवक मिटींगला जाणीवपूर्वक गैरहजर राहिले, त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी मांडलेल्या उपसूचना या मंजूर झाल्या असल्याचा आरोप विरोधी गटातील गटनेते अशोक राव जाधव यांनी पत्रकाद्वारे केला.
आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये फलटणची जनता सत्ताधारी नेते मंडळींना विरोधी बाकावर बसवले शिवाय राहणार नाही व यापुढे फलटण नगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असे मत गटनेते अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले आहे.

No comments