एसटीच्या अपघात सहाय्यता योजना ट्रस्टचा कारभार पारदर्शक हवा : रणजित श्रीगोड
The management of ST's Accident Assistance Scheme Trust should be transparent
फलटण : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या अपघात सहाय्यता योजना ट्रस्टचा कारभार पारदर्शक करुन, हिशेब लोकांसमोर ठेवले जावेत वगैरे ९ मागण्यांचे निवेदन राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना देण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एस. टी.) सुरु केलेल्या अपघात सहाय्यता योजना ट्रस्टचे कामकाज पारदर्शी ठेवून त्याबाबत माहिती लोकांना मिळाली पाहिजे यासाठी प्रवासी संघटना व महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाच्या माध्यमातून आपण गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहोत मात्र दाद घेतली जात नसल्याने आता ना. बाळासाहेब थोरात यांना त्याबाबत निवेदन देण्यात आल्याचे रणजित श्रीगोड यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
तत्कालीन अधिकारी यांनी चुकीच्या पद्धतीने ट्रस्टची रचना केल्याने ते त्याबाबत माहिती देवू शकले नसल्याचे नमूद करीत महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांना ९ मुद्दे घालुन निवेदन देण्यात आले त्यावेळी रणजित श्रीगोड, आ. लहु कानडे, आ. सुधीर तांबे, हिंद सेवा मंडळाचे मानद सचिव संजय जोशी, माजी कार्यध्यक्ष ब्रिजलालजी सारडा उपस्थित होते.

No comments