पत्रकार किरण बोळे यांना मातृशोक
फलटण दि. 24 ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - येथील दैनिक सकाळ वृत्तपत्राचे प्रतिनिधी किरण बोळे यांच्या मातोश्री श्रीमती लता किसनराव बोळे यांचे वयाच्या 76 वर्षी कोळकी येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने काल दि.23 रोजी निधन झाले. त्यांच्यावर फलटण येथील वैकुंठ स्मशानभूमीत रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
मनमिळाऊ, शांत स्वभावाच्या आरोग्य पर्यवेक्षिका म्हणून बारामती तालुक्यात त्या प्रसिद्ध होत्या. त्यांनी पणदरे, कोऱ्हाळे, झरगरवाडी, कारखेल, शिरसुफळ या ठिकाणी आरोग्य पर्यवेक्षिका म्हणून सेवा बजावली आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व नातवंडे असा परिवार आहे.
उद्या दि. २५ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८ सावडणेचा विधी फलटण स्मशानभूमी येथे व १० वाजता दत्तघाट, फलटण येथे दहाव्याचा विधी संपन्न होणार आहे.
No comments