कृषीदूताने दिले शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे धडे
![]() |
एकात्मिक तण नियंत्रण प्रात्यक्षिक |
Krushidoot gave modern farming lessons to the farmers
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथील कृषिदूत विकास चंद्रकांत मुळीक यांनी ग्रामीण कृषी जागरूकता व औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२१-२२ च्या अभ्यास दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक माहिती व शास्त्रशुद्ध पद्धतीने शेती कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे मधील सहयोगी अधिष्ठाता डॉ.एस. डी. मासाळकर सर, प्रा.डॉ.एच.पी.सोनवणे सर, केंद्रप्रमुख डॉ.यु.डी.जगदाळे सर आणि कार्यक्रम अधिकारी डॉ.एम.व्ही. अजोतीकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम राबविण्यात आला.
![]() |
बीजप्रक्रिया विषयी माहिती देताना विकास मुळीक |
यावेळी शेतकऱ्यांचा शेतीविषयक अनुभव जाणून घेऊन त्यांना नवीन आधुनिक व शास्त्रीय शेतीची माहिती देण्यात आली. तसेच मोबाईलचा शेतीच्या विविध क्षेत्रातील उपयोग आणि शेतीविषयक आधुनिक उपकरणांची ओळख करून देण्यात आली, पिकावर आवश्यक असणारी सेंद्रिय खते औषधे यांचा योग्य वापर कसा करावा ,एकात्मिक कीडनियंत्रण, एकात्मिक तण व्यवस्थापन, गुरांचे लसीकरण ,मातीचे परीक्षण, बीजप्रक्रिया ,आंब्याचे कलम व दुग्धजन्य पदार्थ कसे करावे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
![]() |
गुरांचे लसीकरण करताना विकास मुळीक |
No comments