पूरग्रस्त महिलांना बारामतीच्या हिरकणीची साथ
Distribute Hirakani sanitary napkins pads to flooded women
बारामती (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोल्हापूर शहराला पुराने विळखा घातला असताना अनेक कुटुंबे त्यांच्याशी सामना करताना हतबल दिसत होती, अनेक कुटुंबे बेघर झाली अनेकांना विस्थापित व्हावे लागले, असंख्य कुटुंबांची उपासमार झाली साथीच्या रोगाने थैमान घातले. सेवाभावी संस्थांकडून व शासनाकडून पूरग्रस्तांना अन्न - वस्त्र - निवारा तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.परंतु स्त्रियांच्या आरोग्य विषयी अनास्थाच दिसून आली. या अनुषंगाने बारामती येथील महिला उद्योजक रेश्मा साबळे व हिरकणी पॅडच्या निर्मात्या यांनी महिलांना आवश्यक असणाऱ्या हिरकणी सॅनिटरी नॅपकिन्स पॅडची कोल्हापूर येथील ग्रामपंचायत प्रयाग चिखली, ग्रामपंचायत आंबेवाडी तसेच देवांग संस्था कोल्हापूर व कामगार महिला कर्मचाऱ्यांना १००० सॅनिटरी पॅडचे वाटप केले.
कोल्हापूर जिल्ह्यात सॅनिटरी पॅडचे वाटपा प्रसंगी उद्योजक अण्णा इदाते, सरपंच, ग्रामस्थ, व आरोग्य सेविका,अंगणवाडी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
No comments