Breaking News

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्ण ; अवनी लखेराने लावला सुवर्ण नेम

India wins gold at Tokyo Paralympics;  Avni Lakhera won the gold medal

गंधवार्ता वृत्तसेवा दि.३० - टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या अवनी लखेराने चांगली कामगिरी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले व सुवर्ण जिंकून इतिहास रचला.

अवनी लेखराने नेमबाजीत देशातील पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. तर पुरुषांच्या F57 प्रकारात योगेश कठुनियाने डिस्कस थ्रोमध्ये रौप्य पदक पटकावले आहे.भालाफेकमध्ये भारताला दोन पदके मिळाली.  देवेंद्र झाझरिया यांनी  64.35 मीटर थ्रोसह रौप्यपदक जिंकले. तर सुंदर गुर्जरने 64.01 मीटरसह कांस्यपदक पटकावले.

अवनी पॅरालिम्पिक गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली महिला आहे. अवनीने महिलांच्या 10 मीटर एअर रायफलच्या वर्ग SH1 च्या अंतिम फेरीत 209 गुण मिळवून सुवर्णपदक जिंकले. याआधी तिने पात्रता फेरीत 7th वे स्थान मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते.

No comments