Breaking News

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताला रौप्य पदक

India wins silver at Tokyo Paralympics

    गंधवार्ता वृत्तसेवा दि.२९ - टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये भारताच्या भाविनाबेन पटेलने चांगली कामगिरी करत इतिहास रचला आहे. टेबल टेनिसच्या महिला एकेरी मध्ये क्लास-4 प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे. अंतिम फेरीत भाविनाबेनचा सामना जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या चायना खेळाडू झोउ यिंग हिच्याशी झाला. यिंगने भाविनाचा 11-7, 11-5 आणि 11-6 असा पराभव करत सुवर्ण जिंकले. यामुळे भाविनाला रौप्यपदक मिळाले. टेबल टेनिसमध्ये पदक जिंकणारी ती भारतीय खेळाडू देखील आहे.

    भाविनाबेनने उपांत्य फेरीत चीनच्या झांग मियाओचा 7-11, 11-7, 11-4, 9-11, 11-8 असा पराभव केला होता. भाविनाबेनने सर्बियाच्या बोरिस्लावा रॅन्कोवीच पेरिचला सलग तीन गेम 11-5, 11-6, 11-7 असे हरवून उपांत्य फेरी गाठली होती. भाविनाबेन पटेलने उपउपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलच्या जॉइस डी ऑलिव्हिराचा 12-10, 13-11, 11-6 असा पराभव केला. 

No comments