Breaking News

पॅराऑलिंपिकमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या भाविनाबेन पटेल, निषाद कुमार यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

Chief Minister Uddhav Thackeray congratulates Bhavinaben Patel and Nishad Kumar for winning silver medals in Paralympics

    मुंबई, दि. 29 : टोकियो पॅराऑलिंपिक स्पर्धेत टेबल टेनिसमध्ये भाविनाबेन पटेल आणि उंचउडी मध्ये निषाद कुमार यांनी रौप्यपदक पटकावले आहे. या दोघांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

  भारतासाठी दोन रौप्यपदक पटकावून भाविनाबेन आणि निषाद यांनी तमाम देशवासियांच्यावतीने आज राष्ट्रीय क्रीडा दिनी मेजर ध्यानचंद यांचे संस्मरण करत असताना त्यांना अभिवादनच केले आहे. मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन. भाविकाबेन, निषाद यांचे या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन, तसेच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा क्षेत्रात कार्यरत प्रशिक्षक, मार्गदर्शक, खेळाडू आणि त्यांच्या मागे उभे राहणाऱ्या कुटुंबियांनाही हार्दिक शुभेच्छा.

No comments