Breaking News

'संवेदनशील लेखक, नाटककार गमावला' - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना श्रध्दांजली

Chief Minister Uddhav Thackeray pays homage to senior playwright Jayant Pawar
    मुंबई, दि. २९ :- ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
    मराठी नाट्य क्षेत्रातील साक्षेपी आणि पत्रकारिता, साहित्य अशा क्षेत्रात निखळ तितकाच संवेदनशील विहार करणारे व्यक्तीमत्व गमावले आहे. मुंबईतील नजरेआड गेलेल्या गिरण्या, कष्टकरी त्यांची गिरणगाव संस्कृती पवार यांच्या मुळे शब्द रूपाने जीवंत आहे. परखड आणि निखळ नाटककार म्हणून त्यांनी आपला असा ठसा उमटवला. या क्षेत्राला त्यांची निश्चितच उणीव भासत राहील, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ नाटककार जयंत पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

No comments