फलटणमध्ये फुटवेअर दुकानदाराला 15 लाख रुपये खंडणी मागितली ; तिघांवर गुन्हा दाखल
फलटण दि. २३ ऑगस्ट (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण येथील शु पॅलेस नावाच्या फुटवेअर दुकान चालकास चाकूचा धाक दाखवून, महिन्याला दहा हजार रुपये रोख किंवा एक रकमी १५ लाख रुपये मागितल्या प्रकरणी फलटण येथील 3 जणांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १ ऑगस्ट २०२१ रोजी ४ वाजता व दि.२१ ऑगस्ट २०२१ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अतुल शशिकांत भोईटे यांना त्यांच्या दुकानात व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रस्ता अडवून, खंडणीची मागणी केली, फिर्यादी अतुल शशिकांत भोईटे व कामगार सिद्धार्थ काकडे, गणेश माने, सुरज उनवणे असे सुपरमार्केट फलटण येथील शु पॅलेस नावाच्या फुटवेअर च्या दुकानात असताना, निलेश चव्हाण ( छोटा मछली), रोहन काकडे व एक अनोळखी साथीदार हे सर्वजण, हातामध्ये चाकू, दगड घेऊन दुकानात आले व फिर्यादी अतुल शशिकांत भोवते यांना म्हणाले, तू महिन्याला दहा हजार रुपये रोख दे, नाहीतर एक रकमी १५ लाख रुपये द्यायचे, तरच तुझे दुकान चालू ठेवायचे, अन्यथा तुझे दुकान आम्ही चालू देणार नाही आणि तू पैशाला नकार दिलास किंवा आम्ही तुला पैसे मागत आहोत याबाबत कुठे बोललास तर तुला संपवून टाकणार अशी धमकी देऊन, खंडणी मागणी केली असल्याची फिर्याद अतुल शशिकांत भोईटे रा. लक्ष्मीनगर फलटण यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करीत आहेत.
No comments