Breaking News

आयुर मॅक्सच्या रासायनिक व सेंद्रिय खत वितरणाचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आयुर मॅक्स मार्केटमध्ये - दिगंबर आगवणे

आयुर मॅक्सच्या रासायनिक व सेंद्रिय खत पोत्यांचे पूजन करताना आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे, पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे, सहायक पोलिस निरीक्षक विशाल वायकर व इतर

 Ayur Max Chemical and Organic Fertilizer Distribution start

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२८ - रासायनिक खतांच्या वाढलेल्या किंमती आणि त्याद्वारे होत असणारी शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी व शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी आपण मार्केट मध्ये आलेलो आहे.   शेतकऱ्यांना आयुर मॅक्स या नावाने दर्जेदार खते उपलब्ध करून देण्यात आली असून, खतांची विक्री फलटण तालुक्यात सुरू करण्यात येत असल्याचे आयुर उद्योग समूहाचे सर्वेसर्वा दिगंबर आगवणे यांनी जाहीर केले. 

    दि. २७ ऑगस्ट २०२१ रोजी लोणंद येथे रेल्वे यार्ड मध्ये आलेल्या आयुर मॅक्सच्या रासायनिक व सेंद्रिय खत रेल्वेमालगाडीचे पूजन करून, मालगाडीतून खते  उतरवण्यात आली, याप्रसंगी दिगंबर आगवणे बोलत होते. यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. जयश्री आगवणे, सहायक पोलीस निरीक्षक विशाल वायकर,  श्री संभाजी शिंदे, श्री दत्तात्रय आगवणे, श्री लालासाहेब साबळे,श्री सोमनाथ रासकर,श्री मोहन खरात,श्री ज्ञानेश्वर कोळकर, श्री रणजीत धुमाळ, श्री प्रणय मतकर, श्री.तात्यासो आगवणे, दत्तात्रय आगवणे, स्नेहल बनसोडे, नितीन गोडसे आदी मान्यवर उपस्थित होते.

    पुढे बोलताना दिगंबर आगवणे म्हणाले की, आज जेडी केमिकल्स अँड फर्टिलायझर्स कंपनीच्या माध्यमातून आयुर मॅक्सच्या खत उत्पादनाची महाराष्ट्रातील पहिली रॅक लोणंद येथे आली असून, मान्यवरांच्या हस्ते त्याचे पूजन केल्यानंतर, ती वितरणासाठी मार्केटमध्ये पाठवण्यात येत आहे. आयुर मॅक्स कंपनीची स्थापना आपण मागील वर्षी केल्यानंतर वर्षभरात कंपनीची उत्पादने बाजारात आणून,  कंपनी नावारूपाला आणली.  महाराष्ट्रात  खाजगी क्षेत्रात उत्कृष्ठ काम करणाऱ्या कंपनीमध्ये आयुर मॅक्सची गणना होऊ लागली आहे. वर्षात अग्रमानांकित कंपनी करू शकलो याचा आज मनस्वी आनंद होत असल्याचे दिगंबर आगवणे यांनी यावेळी सांगितले.

    आयुर मॅक्सच्या रासायनिक व सेंद्रिय खतांच्या विक्रीसाठी संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा वितरक व तालुका वितरक नेमणे सुरू असून , वितारकांनी याचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी, मो. 83870 21111 या क्रमांकावर संपर्क साधावा.

जेडी केमिकल्स अँड फर्टिलायझर्सच्या आयुर मॅक्स खतांमुळे, शेतजमिनीला आवश्यक असणाऱ्या अन्नघटकांचा पुरवठा होतो. शेतीत भरघोस उत्पन्न निघते. तसेच चोपण जमीन सुधारण्यासाठी मदत होते. शेत जमिनीचे व्हायरसपासून संरक्षण होते. पिकातील हिरवेपणा लवकर वाढतो. पिकाच्या जोमदार वाढीसाठी मदत होते. या खतामुळे जमिनीला संतुलित पोषण देण्याचे काम केले जाते त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढते. शेतकरी बंधूंना केवळ खत पुरवठा न करता त्यांच्या अडीअडचणी व आवश्यक त्या सेवा सुविधा पुरवणे हा आयुर मॅक्स कंपनीचा मुख्य उद्देश असल्याचे दिगंबर आगवणे यांनी यावेळी सांगितले.

No comments