निर्बंधांचे उल्लंघन : धुमाळवाडी धबधबा पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर कारवाई
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ११ जुलै - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी लावलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करून, धुमाळवाडी येथील धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई करून दंड वसूल केला.
आज दिनांक ११ जुलै २०२१ रोजी धुमाळवाडी धबधबा येथे जिल्हाधिकारी सातारा यांनी लावलेल्या निर्बंधांचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तरुणावर दंडात्मक कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये ७५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. १० गाड्यांवर मोटार वाहन अधिनियम नुसार कारवाई करण्यात आली. ही कारवाई पर्यविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक स्वाती धोंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली यादव दादा, राऊत दादा, बडे दादा , पोलीस पाटील धुमाळवाडी ग्रामसुरक्षा दल , व ग्रामपंचायत सदस्य संदिप पवार हे उपस्थित होते . झालेल्या कारवाईबाबत गावातील लोकांनी समाधान व्यक्त करून धोंगडे मॅडम यांचे आभार व्यक्त केले
No comments