Breaking News

गरोदर महिला कोविड-19 ची लस घेऊ शकतात का ?

Can pregnant women take Covid 19 vaccine?

    कोविड लसी संदर्भात वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी हे काही प्रश्न आहेत. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी डीडी न्यूज या वृत्तवाहिनीवरच्या विशेष कार्यक्रमात कोविड-19 लसीकरणाबाबत जनतेच्या मनातल्या विविध शंकांचे निरसन केले. 

गरोदर महिला कोविड-19 ची लस घेऊ शकतात का ?

Can pregnant women take Covid 19 vaccine?

डॉ. व्ही. के. पॉल  :  सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार (पत्र सूचना कार्यालयाचे 19 मे रोजीचे प्रसिद्धीपत्रक वाचावे - https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1719972 ) गरोदर महिलांना लस देण्यात येऊ नये. लसीच्या चाचण्यामधून उपलब्ध झालेल्या डाटानुसार, डॉक्टर आणि वैज्ञानिक समुदायाने, गरोदर महिलांना लस देण्याची शिफारस करणारा निर्णय घेतलेला नाही. तथापि यासंदर्भातल्या नव्या शास्त्रीय माहितीच्या आधारावर केंद्र सरकार यासंदर्भात परिस्थिती स्पष्ट करेल.

    अनेक कोविड-19 लसी गरोदर महिलांसाठी सुरक्षित आहेत असे दिसून आले आहे, आपल्या दोन लसींनाही हा मार्ग मोकळा होईल अशी आमची आशा आहे. मात्र लस अतिशय अल्प काळात विकसित झाली आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रारंभिक चाचण्यांमधे सर्वसाधारणपणे गरोदर महिलांचा समावेश केला जात नाही हे लक्षात घेऊन जनतेने संयमाने आणखी थोडी प्रतीक्षा करावी.

डॉ. रणदीप गुलेरिया :  अनेक देशांनी गरोदर महिलांसाठी लसीकरण सुरु केले आहे. अमेरिकेच्या एफडीएने फायझर आणि मॉडेर्ना लसींना मान्यता दिली आहे. कोवॅक्सीन आणि कोविशिल्ड संदर्भातला डाटा लवकरच उपलब्ध होईल, काही डाटा आधीच उपलब्ध आहे, आवश्यक असलेला संपूर्ण डाटा काही दिवसात उपलब्ध होईल आणि भारतातही गरोदर महिलांच्या लसीकरणासाठी परवानगी मिळेल अशी आशा आहे. 

स्तनदा माता कोविड-19 प्रतिबंधक लस घेऊ शकतात का ?

What about lactating mothers ?

डॉ. व्ही. के. पॉल  :  यासंदर्भात अतिशय स्पष्ट मार्गदर्शक सूचना असून स्तनदा मातांसाठी लस पूर्णपणे सुरक्षित आहे. कोणतीही भीती बाळगण्याचे कारण नाही. लसीकरणापूर्वी किंवा नंतर बाळाचे स्तनपान थांबवण्याची आवश्यकता नाही. (https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1719972)

No comments