Breaking News

उपनिषद काळ ते आजच्या आधुनिक युगा पर्यंत आई आपले आईपण जपत आहे - डॉ. बदने

Principal Shivajirao Bhosale Vicharmanch Phaltan delivered a lecture on Matrudevobhav

प्राचार्य शिवाजीराव भोसले विचारमंच फलटण च्या वतीने मातृदेवोभव! विषयावर व्याख्यान संपन्न 

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - प्राचार्य शिवाजीराव भोसले विचारमंच फलटणच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने, मातृदेवोभव! या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये डॉ. रामकृष्ण बदने यांनी मार्गदर्शन केले.

     प्राचार्यांची प्रेरणा आणि मार्गदर्शनाने महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी घडल्याचे बदने यांनी नमूद केले. मातृदेवोभव! या विषयाला अनुसरून, आईचे महत्व, मोठेपणा आणि आईबद्दल असणारा जिव्हाळा, डॉ. बदने यांनी व्यक्त केला. उपनिषद काळापासून ते आजच्या आधुनिक युगातील आई ही, आपले मातृत्व, आईपण कसे जपत आहे. काळाच्या प्रभावाने वाहून न जाता, आपल्यातील मृदुता आणि वात्सल्य हे आपल्या मुलांच्या संस्कारांमध्ये रुजवत असते, हे सांगताना डॉ. बदने यांनी ओव्या, जात्यावरची गाणी, यांच्या साह्याने खूप मौलिक भाषेत मार्गदर्शन केले.

    यावेळी प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या विचारांचा अभ्यास करून, विद्यावाचस्पती पदवी प्राप्त झालेले डॉ. मनोज पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विचारमंचाचे अध्यक्ष डॉ. रासकर एन. के. यांनी केले. अध्यक्षीय मनोगत संस्थापक-अध्यक्ष डॉ. गवरे सुनीलदत्त यांनी व्यक्त केले. ऑनलाइन कार्यक्रमास विचारमंचाचे उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब मुळीक, सचिव डॉ. भोईटे सुनील तसेच  प्राचार्य भोसले सरांचे विचार प्रेमी उपस्थित होते.

No comments