Breaking News

22 जुलै रोजी जिल्हा रुग्णालय सातारा येथे सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन

Organizing All Diagnosis Camp on 22nd July at District Hospital Satara

     सातारा  (जिमाका) : जिल्हा रुग्णालय सातारा येथे दि. 22 जुलै 2021 रोजी  सर्वरोग निदान शिबीर आयोजित करण्यात आलेले आहे. हे शिबीर जिल्हा रुग्णालय सातारा. या ठिकाणी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत होणार असून सर्व गरजूनी या शिबीराचा लाभ घ्यावा. असे आवाहन डॉ.सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक,सातारा. यांनी केले आहे.

    या सर्वरोग निदान शिबीरामध्ये रक्तदान,कर्करोग,मोतीबिंदू,व कॅटरॅक्ट शस्त्रक्रिया,कावीळ चाचणी, व लीसकरण, बालरोग निदान व शस्त्रक्रिया, क्ष-किरण व सोनोग्राफी सर्व प्रकारच्या प्रयोगशाळेतील रक्त चाचण्या, महिलांच्या आजाराचे निदान व उपचार, दंतचिकित्सा, मानसिक आरोग्य चाचणी व उपचार, अस्थिरोग तपासणी, कान,नाक व घास या आजाराचे निदान व उपचार, ऐच्छिक गुप्तरोग व एचआयव्ही चाचणी व उपचार, कोविड ॲन्टीबॉडी चाचणी, क्षयरोग व कुष्ठरोग निदान व उपचार, महात्मा फुले जनआरोग्य योजना माहिती व नोंदणी आयुष अंतर्गत योगा, होमिओपॅथी, युनानी तपासणी व उपचार इ.सेवा देण्यात येणार आहेत. शिबीरामधील सर्व आरोग्य सेवा या निशुल्क आहेत.तरी सर्व गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा. असेही जिल्हा शल्यचिकित्सक,सातारा यांनी कळविले आहे.

No comments