Breaking News

अवैध वाळू वाहतूक प्रकरणी अलगुडेवाडी येथील एकावर गुन्हा दाखल

Filed a case against one in an illegal sand transport case

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २० :  अलगुडेवाडी तालुका फलटण गावच्या हद्दीत ट्रॅक्टर - ट्रॉलीच्या सहाय्याने अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी, अलगुडेवाडी येथील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, ट्रॅक्टर ट्रॉली व आता ब्रास वाळू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, आकाश एकनाथ विटकर वय २२ वर्षे रा. अलगुडेवाडी ता.फलटण जि. सातारा याने दिनांक १७ जुलै २०२१ रोजी रात्री १०.४० वा चे सुमारास लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा ५७५ डी आय ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये बेकायदा बिगर परवाना अवैधरित्या  अर्धा ब्रास वाळु भरुन घेवुन जाताना मिळुन आल्याने,  आकाश विटकर याच्यावर गुन्हा दाखल करून ट्रॅक्टर ट्रॉली व वाळू पोलिसांनी जप्त केली आहे.

    अधिक तपास पोलिस नाईक एच. एस. धराडे करीत आहेत.

No comments