Breaking News

कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांना सातारा पत्रकारांची आदरांजली

कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना सातारा जिल्हा पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशन आणि सातारा शहर पत्रकार संघाचे   पदाधिकारी 

On the occasion of the birth centenary of Comrade Vasantrao Ambekar, he was honored by Satara journalists

    सातारा (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा येथील साम्यवादी विचारधारेचे स्मृतीशेष पत्रकार कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभी यांना सातारा येथील सातारा जिल्हा पत्रकार संघ व इलेक्ट्रॉनिक मिडीया असोसिएशन आणि सातारा शहर पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने पदाधिकाऱ्यांनी आदरांजली वाहिली.               

     कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांनी आचार्य अत्रे यांच्या आग्रहाखातर सर्वात प्रथम मराठा या वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून काम पाहिले. निर्भीड व कोणालाही न घाबरणारे असे हे व्यक्तिमत्व असलेले पत्रकार होते. सोशल मीडिया अथवा इलेक्ट्रॉनिक मीडिया नसताना या कालावधीत वसंतराव आंबेकर यांनी सर्व जनतेपर्यंत आपले म्हणणे पोचवण्याची साधन म्हणून सातारच्या पोवई नाक्यावर एका फलकावर बातमी पत्र लिहिण्यास सुरुवात केली, आणि नंतर मग ते वृत्तपत्र माध्यमात काम करू लागले अशा एका पत्रकाराची आज जन्मशताब्दी वर्ष सुरू होत आहे याचे औचित्य साधून कॉ. वसंतराव आंबेकर यांना सातारा मधील पत्रकारांनी अभिवादन केले.

    यावेळी हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी, तुषार तपासे, किरण मोहिते, ओंकार कदम, सनी शिंदे, प्रतिक भद्रे, प्रशांत जगताप व सुजित आंबेकर यांनी स्मृतीशेष कॉम्रेड वसंतराव आंबेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन केले.

No comments