Breaking News

सद्‌गुरू व महाराजा संस्था समुहाच्या दिनदर्शिकचे प्रकाशन

The calendar of the Sadguru and Maharaja Group of Institutions was released.

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - श्री सद्‌गुरू हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्या. फलटण या संस्थने सभासद, ठेवीदार व ग्राहकांसाठी तयार केलेल्या २०२६ च्या आकर्षक दिनदर्शिकचा प्रकाशन सोहळा सद्‌गुरू व महाराजा संस्था समुहाच संस्थापक अध्यक्ष मा. दिलीपसिंह भोसले, श्री सद्‌गुरु हरिबुवा महाराज नागरी सह. सहकारी पतसंस्थच चेअरमन तेजसिंह भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. श्री दिलीपसिंह भासले यांच्या हस्त दिनदर्शिकच प्रकाशन करणेत आले, यावेळी पतसंस्थच व्हा. चेअरमन राजाराम फणसे, संचालक प्रभाकर भोसले, महाराजा मल्टिस्टेटच व्हा. चेअरमन रणजीतसिंह भोसले, संचालक अमोल सस्ते, निलेश मोरे, दिपराज तावरे, सद्‌गुरू व महाराजा संस्था समूहाचे सरव्यवस्थापक संदिप जगताप, व सद्गरू संस्था समहाचे सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
    महाराष्ट्राची परंपरा व संस्कृतीनुसार दिनदर्शिकत माहिती समाविष्ट करून ती जपण्याचा प्रयत्न केला आहे संस्थने सुबक, आकर्षक रंगातील दिनदर्शिका नेहमीप्रमाणे उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय व राज्यस्तरीय नेत्यांची जयंती, पुण्यतिथी, हिंदू पंचांगाप्रमाणे विविध मुहूर्त व धार्मिक माहिती उपलब्ध करून दिली आहे. 

    त्याचप्रमाणे संस्थेच्या ठेवी व त्यावरील व्याज दर संस्थेचे अन्य उपक्रम प्रत्येक पानाच्या तळभागावर सद्‌गुरू व महाराजा संस्था समूह आणि स्वयंसिध्दा महिला संस्था समूहातील विविध संस्था व त्यांच्या प्रमुख पदाधिका-यांची नावे उपलब्ध करून दिलेली आहे. सद्‌गुरू व महाराजा संस्था समूहाची प्रगतीकडे वाटचाल  चालु आहे मार्च २०२५ मध्य संस्था समूहाच वसूल भागभांडवल रु.४ कोटी ५४ लाख ६३ हजार इतके असुन, ठेवी १९३ कोटी ३३ लाख, कर्ज १५५ कोटी ४२ लाख, नफा २ कोटी ६६ लाख, गुंतवणुक ६५ कोटी ४७ लाख तसेच रू. १६० कोटी ४४ लाख एवढे संस्था समूहाचे खेळते भांडवल आहे अशी माहिती श्री सद्‌गुरू हरिबुवा महाराज पतसंस्थचे चेअरमन तेजसिंह भासले यांनी दिली. संस्था समूहामध्ये ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यांना सहकार्य केले जाते संस्था समुहातील सर्व कर्मचाऱ्यांचे सभासद, ठेवीदार, कर्जदार यांना नेहमीच सहकार्य असते.

No comments