Breaking News

"सत्याचा आसुड" शेतकऱ्यांच्या वेदनेचे व संघर्षाचे बीज : डॉ. वसंत काटे प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट अमेरिका

"Setkaryancha Aasud" is the seed of the farmers' pain and struggle: Dr. Vasant Kate

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१६ - ग्रामीण भागातील माणसांच्या व्यथा, वेदना, भावभावना, सुखदुःख, याचं प्रकटीकरण होत राहिलं होतं, शहरी जीवनापेक्षा ग्रामीण जीवन निराळ आहे, वेगळं आहे, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत, ग्रामीण जीवनाचा कर्ता, करविता जो शेतकरी आहे, त्याचे बदलत्या परिस्थितीनुसार कसे हाल होत आहेत, शेती करून, पिकवून इतरांना धनधान्य मिळवून देणारा शेतकरी, स्वतःच कसा उपाशी मरतो आहे, अगदी आत्महत्या करण्याची त्याच्यावर वेळ येते असे चिंतन सत्याचा आसूड या कादंबरीचे प्रकाशन करताना अमेरिका येथील प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट डॉ वसंत काटे यांनी केले 

    यावेळी फलटण साहित्य परिषदेच्या शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे ,लेखक सुरेश शिंदे , प्रा विजय खुडे , भरत सुरसे , साहित्यिक रविंद्र वेदपाठक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना डॉ काटे पुढे म्हणाले अनियमित पाऊस, अतिवृष्टी, अनियमित हवामानातील बदल, शेतीसाठी लागणारी कीटकनाशके, बी बियाणे, यांची उपलब्धता आणि खर्च, तसेच पिकांना योग्य भाव न मिळणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा बाजारपेठेचा अभाव, बाजारात माल पोहोचवण्याची अडचण, इत्यादी अनेक प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारा, ग्रामीण साहित्यिक सुरेश शिंदे फलटण यांनी केलेले वर्णन 'सत्याचा आसूड' मधून वेदना देऊन जाते 

    अध्यक्षीय भाषणात महाराष्ट्र साहित्य परिषद, फलटण शाखेचे कार्याध्यक्ष महादेव गुंजवटे यांनी अत्यंत सुरेख शब्दात योग्य मांडणी करून सुरेश शिंदे यांच्या दिवंगत पत्नी सुलेखा शिंदे यांच्या साळवणाची खोप, मालकाचं खातं, लेखकाचं घर पेलताना, इत्यादी अनेक कादंबरींवर प्रकाश झोत टाकला, "सत्याचा आसूड" या कादंबरीत शेतकऱ्यांच्या खऱ्याखुऱ्या समस्यांचा मागोवा  सुरेश शिंदे यांनी घेतला असल्याचे स्पष्ट केले, या कादंबरीचे डॉ. काटे सर यांनी इंग्रजी अनुवाद करून ती प्रकाशित करावे देश विदेशातील अनेकांना याचा फायदा होईल, असे मत व्यक्त केले.

No comments