Breaking News

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मोफत प्रशिक्षणाची संधी

Opportunity for free training under CM MahaArogya Skills Development Training Program

   सातारा  (जिमाका) : कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. त्यामुळे रुग्णालयामध्ये उपलब्ध असणाऱ्या पायाथूत सुविधांचा वापर करुन त्याच ठिकाणी कुशल मनुष्यबळ तयार करण्याकरीता सन 2021-22 साठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.

  या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींना  नि:शुल्क प्रशिक्षण देण्यात येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार  व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नवीन प्रशासकीय इमारत, एस. टी. स्टँडच्या मागे, सातारा (दुरध्वनी क्र. 0216-239938) या कार्यालयाशी संपर्क साधावा.

No comments