पीक स्पर्धेमुळे शेतकऱ्यांच्या पीक उत्पादनात वाढ - श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर
राजाळे येथे कृषि संजीवनी सप्ताह समारोप व कृषि दिन कार्यक्रम संपन्न
राजाळे (गंधवार्ता वृत्तसेवा) - कृषि विभागा मार्फत राबविण्यात आलेल्या पीक स्पर्धा कार्यक्रम हा उत्कृष्ट असून, यामुळे शेतकऱ्यांना प्रेरणा मिळते, त्यांच्यात उत्साह वाढतो आणि पिकांच्या उत्पादन वाढीस मदत होत असल्याचे पंचायत समिती सभापती श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी सांगितले.
१ जुलै २०२१ रोजी राजाळे ता फलटण जिल्हा सातारा येते कृषि संजीवनी सप्ताह समारोप व कृषि दिन आयोजन केला होता. यावेळी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्या कांचनमला निंबाळकर, सरपंच राजाळे सविता शेडगे, उपसरपंच राजाळे शरद निंबाळकर, उपविभागीय कृषि अधिकारी भास्करराव कोळेकर, तालुका कृषि अधिकारी सुहास रणसिंग, मंडळ कृषि अधिकारी विडणी अमोल सपकाळ, मंडळ कृषि अधिकारी बरड भरत रणवरे, कृषी अधिकारी पंचायत समिती दीपक महागडे, कृषी पर्यवेक्षक जिल्हा मृद सर्वेक्षण अधिकारी सातारा सुनील यादव उपस्थित होते.
पुढे बोलताना शिवरूपराजे म्हणाले, शासनाने प्रकाशित केलेल्या सोयाबिन पुस्तिका व मका पिकावरील लष्करी आळी नियंत्रण पत्रिका, जमीन सुपीकता नुसार खत मात्रा माहीती पत्रिका शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत. कृषि विभागा मार्फत राबविण्यात येत असलेले बीजप्रक्रिया मोहिम स्तुत्य उपक्रम आहे. पीक स्पर्धेमध्ये सहभागी होऊन जास्त उत्पादन घेतलेल्या शेतकऱयांनी वापरलेले तंत्रज्ञान इतर शेतकऱ्यांना सांगावे म्हणजे त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांना होईल.
यावेळी उपविभागीय कृषि अधिकारी फलटण भास्करराव कोळेकर यांनी, रब्बी हंगाम पीक स्पर्धेत शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करून, अमेरिकीन लष्करी अळी नियंत्रण माहिती पत्रकाबाबत माहिती सांगितली. त्याचबरोबर आळी पासून पिकाचा बचाव करण्यासाठी मार्गदर्शन केले तसेच आधुनिक तंत्रज्ञान चा अवलंब केल्यास उत्पादन वाढण्यास मदत होणार असल्याचे यावेळी भास्करराव कोळेकर यांनी सांगितले.
यावेळी तालुका कृषि अधिकारी फलटण यांनी कृषि संजीवनी सप्ताह समारोप व फलटण तालुक्यातील कृषि संजीवनी कार्यक्रमाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचवण्याचे काम झाल्याचे सांगितले व कृषि दिनाचे महत्व यावेळी सुहास रणसिंग यांनी विशद केले.
यावेळी कृषि पर्यवेक्षक जिल्हा मृद परीक्षण व सर्वेक्षण अधिकारी सातारा सुनील यादव यांनी सोयाबिन व जमीन सुपीकता निर्देशांक व १० टक्के रासायनिक खत बचत बाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले.
कृषि संजीवनी सप्ताह समारोप व कृषि दिन कार्यक्रमाच्या सुरवातीस कै वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे पूज करण्यात आले. त्यांनतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालुका स्तरीय रब्बी हंगाम पीक स्पर्धा विजेते गहू पीक प्रथम क्रमांक श्री गिरिश कदम गाव राजाळे तसेच द्वितीय क्रमांक पुरस्कार राजेंद्र जाधव गाव सांगवी व छाया लाळगे गाव वडले आणि तालुका स्तरीय हरभरा पीक स्पर्धा प्रथम क्रमांक रामचंद्र सांवत चौधरवाडी , द्वितीय पुरस्कार रवींद्र शिंदे ,तृतीय क्रमांक बुवासो गुंजवटे चौधरवाडी या विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी जोशी हॉस्पिटल ली यांच्या सौजन्याने शेतकऱ्यांना बांधावर लागवडीसाठी प्रति शेतकरी एक आंबा कलमे वाटप प्रमाणे ५० शेतकऱ्यांना व बीजप्रक्रिया साठी RCF कंपनी कडून बायोला वाटप व कृषि विभागा मार्फत सॊयाबिन पुस्तिका व मका पिकांवरील अमेरिकन लष्करी अळी नियंत्रण माहीती पत्रक वाटप तसेच जमीन सुपीकता नुसार सायनीक खत बचत माहीती पत्रिका मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
कृषि संजीवनी सप्ताह समारोप व कृषि दिन कार्यक्रमास ग्रामपंचायत सद्स्य प्रेमचंद भोईटे, तंटा मुक्ती अध्यक्ष राजेंद्र निंबाळकर राजाळे, कृषि पर्यवेक्षक विडणी अंकुश इंगळे, सावता टिळेकर,मल्हारी नाळे ,दत्तात्रय एकळ कृषि सहाय्यक राजाळे सचिन जाधव , राष्ट्रीय केमिल्स फर्टिलायझर प्रतिनिधी ओंकार रणवरे , कृषि मित्र कमलाकर भोईटे व रब्बी हंगाम पीक स्पर्धा विजेता शेतकरी व पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी सहायक राजाळे श्री सचिन जाधव यांनी केले तर आभार माजी सरपंच संभाजी निंबाळकर यांनी मानले.


No comments