पतीचे विवाहबाह्य संबंध पत्नीस समजल्याने पतीकडून पत्नीचा छळ
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीस समजले आणि पतीकडून पत्नीचा छळ सुरू झाला. मारहाण, शिवीगाळ करीत कामासाठी लागणाऱ्या पैश्यासाठी दागिने आणून देण्याची मागणी पतीकडून होत असल्या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पती विकी गायकवाड रा. सांगवी ता. फलटण याचे विवाहबाह्य संबंध असल्याचे पत्नीस समजले तेव्हापासुन माहे जानेवारी २०२० ते दिनांक १६/६/२०२१ रोजी दपारी ४.०० वा. पर्यंत पती हा मौजे सांगवी ता.फलटण गावचे हद्दीत राहते घरी पत्नीचा वारंवार मारहाण करुन शारिरीक व मानसिक छळ जाचहाट करीत आहे. तसेच विकी गायकवाड याने त्याच्या काम धंद्याकरीता लागणाऱ्या पैशासाठी दागिने आणून दे असे सांगुन ते न दिल्यामुळे पत्नीस मारहाण करुन शिवीगाळ करुन, दमदाटी केली असल्याची फिर्याद पत्नी नयन गायकवाड यांनी दिली आहे.
अधिक तपास पोलीस हवालदार ए.एस. कर्णे करीत आहेत.
No comments