फलटण तालुक्यात 66 कोरोना बाधित ; तरडगाव 14
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 4 जुलै 2021 - आज फलटण तालुक्यात जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 66 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यामध्ये 45 नागरिकांच्या आर.टी.पी.सी.आर. चाचण्या तर व 21 नागरिकांच्या आर.ए.टी. कोरोना चाचण्यांचा समावेश आहे.
आज दि. 4 जुलै 2021 रोजी मिळालेल्या आकडेवारीनुसार फलटण तालुक्यात 66 बाधित आहेत. यामध्ये फलटण शहर 4 तर ग्रामीण भागात 62 रुग्ण बाधित सापडले आहेत. ग्रामीण भागात तरडगाव 14, पाडेगाव 6, राजुरी 6, हिंगणगाव 4, धुमाळवाडी 1, खामगाव 1, खुंटे 2, खटकेवस्ती 1, मलवडी 1, शिंदेवाडी 1, निंबळक 1, निरगुडी 1, गिरवी 2, वाखरी 1, चौधरवाडी 1, ताथवड़ा 1, जाधववाडी 2, ढवळ 1, झडकबाईचीवाडी 2, ठाकुरकी 1, कोळकी 3, कुसूर 1, परहर बु 1, वडले 1, जावली 1, आंधळी ता माण 3, दहिवडी 1 रुग्ण बाधित सापडले आहेत.
No comments