श्रीमंत संजीवराजे यांच्याकडून तालुक्यातील कोरोना केअर सेंटर्सचा आढावा
![]() |
| हिंदवी पॅलेस तरडगाव कोरोना विलगीकरण कक्षाचा आढावा घेताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण |
गंधवार्ता वृत्तसेवा फलटण, दि. ६ जून - सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज फलटण तालुक्यातील विविध कोरोना केअर सेंटरला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन रुग्णांची विचारपूस केली. याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थित रुग्णांना अंडी व फळांचे वाटप करण्यात आले.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज साठे फाटा कोरोना विलगीकरण कक्ष, पवारवाडी कोरोना विलगीकरण कक्ष, गोखळी विलगीकरण कक्ष, हिंगणगाव कोरोना विलगीकरण कक्ष तसेच हिंदवी पॅलेस तरडगाव कोरोना विलगीकरण कक्षास भेटी देऊन, रुग्णांना व विलगीकरण कक्षास काही अडचणी आहेत का? याचा आढावा घेऊन संबंधित कार्यकर्ते व पदाधिकारी यांना योग्य त्या सूचना दिल्या. याप्रसंगी त्यांच्यासमवेत फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते.
![]() |
| रावडी बु. येथील रक्तदान शिबिरास भेट दिली याप्रसंगी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, शिवरूपराजे खर्डेकर |
रावडी बु. येथे नानासो जगन्नाथ सुळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी भेट दिली. याप्रसंगी आमदार दीपक चव्हाण, पंचायत समितीचे सभापति शिवरूपराजे खर्डेकर उपस्थित होते.
![]() |
| श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थित हिंदवी पॅलेस तरडगाव कोरोना विलगीकरण कक्षास अंडी व फळांचे वाटप |
हिंदवी पॅलेस तरडगाव कोरोना विलगीकरण कक्ष व हिंगणगाव कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व आमदार दीपक चव्हाण यांच्या उपस्थित अंडी व फळांचे वाटप करण्यात आले.





No comments