संत सावतामाळी सामाजिक सांस्कृतिक गणेशोत्सव मंडळाच्यावतीने कोरोना योद्ध्यांचा सत्कार व मोफत गोळ्या वाटप
फलटण - संपूर्ण जगाला सध्या कोरोना महामारीने ग्रासले आहे, अनेक लोकांना आपले सर्वस्व गमवावे लागले आहे. हे संकट नष्ट करण्यासाठी सर्वजण अहोरात्र झटत आहेत. विडणी ता. फलटण येथे देखील कोरोना प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे, आज पर्यंत 700 च्या वरती विडणी मध्ये लोक बाधित झाले आहेत. हा संसर्ग रोखण्यासाठी कार्यरत असलेले विडणी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्यसेवक, आशा कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलीस पाटील,गावातील सर्व डॉक्टर प्रयत्न करत आहेत. आपल्या जीवावर उधार होऊन त्यांचे हे कार्य अहोरात्र चालू आहे आणि त्यांच्या या कार्यास एक कौतुकाची थाप म्हणून व एक सामाजिक बांधिलकी म्हणून संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळ विडणी यांनी कोविड योद्ध्यांचा सत्कार ग्रामपंचायत कार्यालयात केला. तसेच रुग्णांना मोफत औषधे वाटप करण्यात आली.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विडणीचे सरपंच रुपाली अभंग, श्रीराम कारखाना चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, संत सावतामाळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष डॉ. किरण शेंडे, ग्रामसेवक चव्हाण, पोलीस पाटील धनाजी नेरकर डॉ. नयन शेंडे, विडणीतील आशा सेविका, गावातील सर्व डॉक्टर तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीस मंडळाचे सचिव श्री. हरी बेडके सर यांनी प्रस्ताविक केले. कोविड योध्याचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. नंतर आरोग्य विभागाला मंडळाच्या वतीने पेशंटसाठी आवश्यक असणारा गोळ्या, प्रिंटर, मास्क अशा स्वरूपाचा वस्तू देण्यात आल्या.
डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी मंडळाचे या कार्याबद्दल आभार व्यक्त केले व सार्वजनिक मंडळीनी, संघटनानी कोरोना काळात प्रशासनास अशा स्वरूपाचे सहकार्य करावे असे मार्गदर्शन केले . मंडळाचे जेष्ठ कार्यकर्ते विठ्ठल नाळे यांनी उपस्थिनाचे आभार मानले.


No comments