Breaking News

सर्वाधिक ! फलटण तालुक्यात 562 तर जिल्ह्यात 2364 कोरोनाबाधित ; 33 बाधितांचा मृत्यू

Corona virus Satara District updates :  33 died and 2364 corona positive

    गंधवार्ता वृत्तसेवा फलटण दि. 25 -  फलटण तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे, रोज सापडणार्‍या बधितांच्या संख्येत सर्वाधिक बाधित आज सापडले आहेत. बधितांची संख्या 562 वर पोहचली आहे. दरम्यान रुग्ण वाढ रोखण्यासाठी फलटण मध्ये आज दी. 25 मे ते 31 मे पर्यन्त कडक निर्बंधांचे पालन करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी दिले आहेत.   

    जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2364 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित  आले असून 33 बाधितांचा मृत्यु झाला तर फलटण तालुक्यात 562 रुग्ण कोरोना बाधित सापडले असून कोणाही बधिताचा मृत्यू झाला नसल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यांनी दिली आहे.

      तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 66 (7045), कराड 302 (21082), खंडाळा 228 (9721), खटाव 359 (14373), कोरेगांव 133 (13302),माण 192 (10484), महाबळेश्वर 11 (3900), पाटण 54 (6243), फलटण 562 (21679), सातारा 316 (33549), वाई 116 (11151 ) व इतर 25 (977) असे आज अखेर  एकूण 153506 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत. 

      तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या  तर आज  अखेर मृत्यू झालेल्या  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे. जावली 4(162), कराड 6 (608), खंडाळा 2 (126), खटाव 7 (388), कोरेगांव 1(300), माण 2(197), महाबळेश्वर 0(42), पाटण 1 (151), फलटण 0(242), सातारा 8 (979), वाई 2 (294) , व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण 3489 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

No comments