पुणे जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचं कोरोनामुळे निधन
गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण दि. 3 एप्रिल 2021 - जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे आज पहाटे कोरोना मुळे (Coronavirus) निधन झाले. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. राजेंद्र सरग यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शेवटपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान, वाढलेली त्यांची शुगर शेवटपर्यंत कमी न झाल्याने अखेर आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. ते 54 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.
नाशिकमधील नांदगाव हे त्यांचे मूळगाव, तर औरंगाबादला त्यांचे पत्रकारितेचे शिक्षण झाले. प्रारंभी पत्रकारिता केल्यानंतर ते शासकीय सेवेत रूजू झाले. बीड, परभणी, नगर आणि पुणे या चार जिल्ह्यात त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी म्हणून काम पाहिले. अतिशय मनमिळावू स्वभाव आणि कार्यतत्परता या गुणांमुळे ते अधिकारी वर्गासोबतच तमाम पत्रकारांमध्ये खूप लोकप्रिय होते.
No comments