फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग जुन्या सर्व्हे प्रमाणे करावा - खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर
![]() |
फलटण पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाबाबत' आढावा बैठकीत सुचना व मार्गदर्शन करताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर |
Phaltan Pandharpur railway line should be done as per the old survey - MP Ranjitsinh Naik Nimbalkar
फलटण : फलटण-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या नविन सर्व्हेक्षणात अनेक गावांमधील जमिनी, घरे जात आहेत. व्यावसायिकदृष्ट्या हे अयोग्य असल्याने फलटण पंढरपूर रेल्वे मार्ग जुन्या सर्व्हे प्रमाणे करण्याचे निर्देश खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा बैठकीत देऊन फलटण ते पुणे या मार्गावर रेल्वे धावण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. तसेच फलटण बारामती रेल्वेमार्गाचा आढावा घेताना त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्याचे हस्तांतरण व जमिनीचा मोबदला याबाबतही चर्चा केली.
सोलापूर रेल्वे विभागाची 'फलटण पंढरपूर रेल्वे सर्वेक्षणाबाबत' आढावा बैठक विभागीय अध्यक्ष व माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे पार पडली त्यावेळी रणजितसिंह यांनी आक्रमक पवित्रा घेतला. बैठकीस डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर रेणू शर्मा, ॲडिशनल डिव्हिजनल मॅनेजर सारेश भाजपे, सिनियर डिव्हिजनल ऑपरेशन मॅनेजर डॉ. स्वप्नील नीला, डिविजनल कमर्शियल मॅनेजर श्याम कुलकर्णी, सीनियर डिव्हिजनल इंजिनीयर नजीब मुल्ला, एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर श्री श्री निवास उपस्थित होते.
लोणंद फलटण पंढरपूर हा सर्व्हेक्षण झालेला व रेंगाळलेला सर्वात जुना रेल्वे मार्ग आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार रणजितसिंह सातत्याने प्रयत्नशील आहेत. गत दोन महिन्यांपुर्वीच त्यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांची भेट घेवून या रेल्वे मार्गासंदर्भात चर्चाही केली होती. तेव्हा गोयल यांनी या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा अहवाल मागविला होता. त्यानुसार नविन सर्वेक्षणाचे काम सुरु झाले असून त्याबाबत अडचणींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. या वेळी खासदार रणजितसिंह यांनी या रेल्वे मार्गावर जुन्या सर्व्हेनुसारच रेल्वे गेली पाहिजे अशी आक्रमक भुमिका घेत रेल्वेच्या नविन सर्वेक्षणाचा अनेक गावांना त्रास होत आहे. अनेक लोकांच्या जमिनी, घरे जात आहेत, व्यवसायिक दृष्ट्या ही गोष्ट योग्य नाही असेही त्यांनी निदर्शनास आनून दिले. त्यामुळे संपूर्ण अहवाल हा जुन्या सर्वेक्षणानुसार गेला पाहिजे असे निर्देशही खासदारांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले. तसेच फलटण बारामती रेल्वेमार्गाचा आढावा घेताना त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या आहेत, त्यांचे हस्तांतरण व जमिनीचा मोबदला याबाबतही चर्चा केली. भविष्यात प्रस्तावित केलेला हैदराबाद मुंबई बुलेट ट्रेन मार्ग याच्यावरही यावेळी चर्चा झाली. त्याच बरोबर फलटण ते पुणे या मार्गावर रेल्वे गाडी सुरू करण्यास काही अडचणी आहेत का ? असतील तर लवकरात लवकर त्या दुरूस्ती करुन लागणारी व्यवस्था निर्माण करने व रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते हा सोहळा लवकरच संपन्न होणार आहे त्याचे स्वरुप व तयारी कशी असणार या बाबतही त्यांनी माहिती घेतली. तसेच माढा तालुक्यातील रेल्वेच्या थांब्याच्या संदर्भामध्ये सोलापूरचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कांबळे यांनी सुचवलेल्या कामाबद्दल चर्चा करून त्यांनी दिलेले प्रस्ताव मार्गी लावण्याचे निर्देशही खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी या बैठकीत दिले.
No comments