Breaking News

केंद्रीय अर्थसंकल्प - चांगली प्रगती दाखविणाऱ्या प्रकल्पांसाठी / कार्यक्रमांसाठी / विभागांसाठी 44,000 कोटी रुपयांहून अधिक तरतूद

Union Budget - Provision of over Rs. 44,000 crore for projects / programs / departments showing good progress

        आज संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22 सादर करताना केंद्रीय अर्थ व कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी भांडवली खर्चात 5.54 लाख कोटी रुपये वाढीची घोषणा केली, जी मागील आर्थिक वर्षातील भांडवली खर्चापेक्षा (4.12 लाख कोटी रुपये) 34.5% जास्त आहे. संसाधनात घट होत असूनही भांडवलावर अधिक खर्च करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे आणि 2020-21 दरम्यान एकूण भांडवली खर्च सुमारे 4.39 लाख कोटी रुपये होईल अशी अपेक्षा आहे असे मंत्र्यांनी सांगितले.

        भांडवली खर्चावर चांगली प्रगती दाखविणाऱ्या आणि पुढील निधीची गरज असलेल्या प्रकल्प / कार्यक्रम / विभाग यांच्यासाठी आर्थिक व्यवहार विभागाला 44,000 कोटी रुपयांहून अधिक साहाय्य करण्यात येईल असे मंत्र्यांनी सांगितले.

        राज्य आणि स्वायत्त संस्थांना त्यांच्या भांडवली खर्चासाठी २ लाख कोटी रुपयांहून अधिक रुपयांची तरतूद केली जाईल, असेही मंत्री म्हणाल्या. राज्यांना देण्यात येणाऱ्या अर्थसाहाय्यापैकी ते जास्तीत जास्त खर्च पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर करतील यासाठी सरकार विशिष्ट यंत्रणा तयार करेल, असेही मंत्री म्हणाल्या .

No comments