Breaking News

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व देऊन आपली सर्वांगीण प्रगती साधावी - संभाजीराव गावडे

Students should make their overall progress by giving importance to sports along with education: Sambhajirao Gawde

        फलटण -: विद्यार्थ्यांनी आपल्या सुप्त कला गुणांसह शैक्षणिक गुणवत्ता ओळखून त्यांना वाव दिला पाहिजे, शिक्षणाबरोबर खेळालाही महत्त्व देऊन आपली सर्वांगीण प्रगती साधावी, केवळ खेळात प्राविण्य मिळवूनही थेट प्रशासकीय सेवेत काम करण्याची संधी प्राप्त होत असल्याचे प्रतिपादन पुणे प्रादेशिक उपविभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे यांनी केले.

        गुणवरे ता. फलटण येथील ब्लूम इंग्लिश मिडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील इयत्ता तिसरी मध्ये शिकणाऱ्या श्रीराम लहु आडके याने नुकतेच सायकलिंग मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक करीत त्याला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यालयामार्फत पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ आणि ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी आवश्यक अँड्रॉइड मोबाईल टॅब देऊन त्याचा यथोचित सत्कार केल्यानंतर मार्गदर्शन करताना संभाजीराव गावडे बोलत होते. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ईश्वर गावडे, सचिव सौ. साधनाताई गावडे, वर्ल्ड रेकॉर्ड नोंदणी सेंटरचे अजित कर्णे प्रशाळेचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.

        प्राचार्य संदीप किसवे म्हणाले, विद्यार्थ्यांना सर्वांगीण दृष्ट्या घडविण्यासाठी अभ्यासाबरोबरच शारीरिक क्षमता वाढविण्याच्या उद्देशाने प्रतिवर्षी क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते, परंतू लॉक डाऊन मध्ये शाळा बंद असताना या विद्यार्थ्याने स्वतः सायकलिंगचा सराव करुन जी कामगिरी केलेली कामगिरी प्रेरणादायी आहे, अभ्यासाबरोबर खेळालाही महत्त्व दिले पाहिजे.

        वर्ल्ड रेकॉर्ड नोंदणी सेंटरचे अजित कर्णे यांनी शाळेमध्ये विद्यार्थ्याकडून होणाऱ्या अशा प्रकारचे रेकॉर्डचे संकलन करुन नोंद केले जाईल तसेच शाळेमध्ये वर्ल्ड रेकॉर्डस् नोंदणी केंद्र सुरु करणार असल्याबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित सर्वांनी श्रीराम आडके याचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

प्रारंभी सौ. साधनाताई गावडे यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात आडके या विद्यार्थ्यांप्रमाणे अन्य विद्यार्थ्यांनी अन्य क्रीडा प्रकारात मिळविलेल्या यशासंबंधी माहिती देऊन आडके याचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीधर गावडे यांनी केले तर आभार रमेश सस्ते यांनी मानले.

No comments