Breaking News

सन्मती सेवा दलाकडून सम्मेद शिखर पहाड स्वच्छता अभियान यशस्वी

श्री सम्मेद शिखर पहाड स्वछता अभियानात सहभागी पदाधिकारी, सभासद

Sammed Shikhar Pahad cleaning campaign by Sanmati Seva Dal successful

        फलटण  : भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटी, भारतवर्षीय दिगंबर जैन महासभा आणि फेडरेशन ऑफ हुमड जैन समाज या शिखर संस्थाच्या सहकार्याने सन्मती सेवा दलाच्या माध्यमातून प्रतिवर्षी श्री सम्मेद शिखरजी तीर्थयात्रा आणि तीर्थक्षेत्र पहाडी स्वच्छता अभियान गेल्या १० वर्षांपासून राबविण्यात येते, यावर्षी दि. १ ते १० फेब्रुवारी दरम्यान हे अभियान यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे.

    श्री सन्मती सेवा दलाचे माध्यमातून स्वच्छता अभियानात प्रतिवर्षी सक्रिय सहभाग घेतला जातो, जैन समाजातील युवकांची ६ जिल्ह्यांची प्राथमिक संघटना असलेल्या सन्मती सेवा दलाच्यावतीने जैन धर्मियांचे तिर्थक्षेत्र असलेल्या शिखरजी (झारखंड) येथील पार्श्वनाथ पहाडावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून सन्मती सेवा दलाचे स्वच्छता अभियानाचे हे दहावे वर्ष आहे. या वर्षी या अभियानासाठी ३५ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. सन २०१२ पासून दरवर्षी हे अभियान राबविले जाते. आज पर्यंत या मध्ये सुमारे ११०० तरुणांनी शिखरजी पहाड स्वच्छता केली आहे. 

         या अभियानासाठी मागील तीन वर्षांपूर्वी गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने संघटनेचा सन्मान केला आहे. प्रतिवर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारी या कालावधीत शिखरजी अभियान राबविण्यात येत असून यामध्ये वंदना, स्वच्छता, पर्यटन चा सहभाग आहे. सेवा दलाचे संस्थापक मिहीर गांधी, माजी अध्यक्ष मयुर गांधी, वीरकुमार दोशी, महावीर दोशी, नमन गांधी, हितेश दोशी, पंकज दोशी, विनोद दोशी, शुभम शहा, राजेश दोशी आयोजक संदेश गांधी यांच्यासह ३५ स्वयंसेवक या अभियानात कार्यरत आहेत.

No comments