Breaking News

पेट्रोल डिझेल दरवाढ सुरूच

Petrol and diesel prices continue to rise

गंधवार्ता वृत्तसेवा, दि.18 फेब्रुवारी 2021- देशात पेट्रोल आणि डिझेलचे दरामध्ये सातत्याने वाढत असून आज सलग 10 व्या दिवशीही तेल कंपन्यांनी दरवाढ केली आहे.  इंधन दरवाढ झाल्यामुळे लवकरच महागाई वाढण्याची शक्यता आहे. आज कंपन्यांनी पेट्रोल दरात 35 पैसे आणि डिझेलमध्ये 32 पैसे वाढ केली. आजच्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोलचा भाव 96.32 रुपये झाला आहे. दरम्यान इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक  चिंताग्रस्त झाला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या किंमती आता 90 रुपये लीटरच्या जवळपास आहेत.  डिझेल येथे 80 रुपये 27 पैसे लीटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 96.32 आणि डीझेल 87.36 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. आज पेट्रोल 35 आणि डीझेलने 32 पैशांनी वाढ झाली.

या महिन्यात गेल्या 14 दिवसांमध्ये 12 व्या वेळा पेट्रोल-डिझेल महाग झाले आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये रेट 10 वेळा वाढले होते.


No comments