Breaking News

आसाम रायफल्समध्ये निवड झाल्याबद्दल अक्षय लिपारे व कु. पौर्णिमा कर्णे यांचा श्रीमंत रामराजे यांच्या हस्ते सत्कार

अक्षय लिपारे  सत्कार करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर

Shrimant Ramraje felicitates Akshay Lipare and Pournima Karne for being selected in Assam Rifles 

फलटण   : स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या माध्यमातून आसाम रायफल्स या सैन्य दलाच्या विभागात कोळकी ता. फलटण येथील अक्षय लिपारे यांची रायफलमॅन म्हणून आणि काळूबाईनगर, मलठण (फलटण) येथील कु. पौर्णिमा कर्णे यांची रायफल वूमन म्हणून निवड झाली आहे. या निवडीबद्दल दोघांचे विविध स्तरावरुन अभिनंदन होत आहे.

कु. पौर्णिमाचा सत्कार करताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर शेजारी डॉ. बाळासाहेब शेंडे, पांडुरंग गुंजवटे वगैरे
     या निमित्ताने अक्षय लिपारे व कु. पौर्णिमा कर्णे यांचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी येथील 'लक्ष्मी विलास पॅलेस' येथे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, फलटणचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक पांडुरंग गुंजवटे, पंचायत समिती सदस्य सचिन रणवरे, संजय देशमुख, गणेश शिंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
           या निवडीनंतर साधारणतः ९ महिन्यांचे म्हणजेच ४४ आठवड्याचे प्रशिक्षण या दोहोंना सैन्य दलामार्फत दिले जाणार आहे. तद्नंतर या दोघांची नियुक्ती आसाम रायफल्स अंतर्गत  विविध बटालियनमध्ये होईल. 
      आसाम रायफल्स हे सैन्य दल सन १८३५ मध्ये स्थापन करण्यात आले होते. आसाम राज्यातील चहाच्या शेतीचे संरक्षण करण्यासाठी या सैन्य दलाची स्थापना झाली होती. दुसऱ्या जागतिक युद्धात देखील या आसाम रायफल्सचा अग्रभागी सहभाग होता. या सैन्य दलात ४६ बटालियन असून साधारणतः ६४ हजार सैनिक या सैन्य दलात सहभागी आहेत. आसाम रायफल्सचे मुख्यालय मेघालय राज्यातील शिलॉंग येथे आहे. तर नागालँड येथे २, आसाम येथे १ प्रशिक्षण केंद्र आहे. २००२ सालापासून इंडो-म्यानमार सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी देखील आसाम रायफल्सकडे आहे. 
      सैन्य दलाची दैदिप्यमान पार्श्वभूमी असलेल्या या आसाम रायफल्समध्ये फलटणच्या अक्षय लिपारे व कु.पौर्णिमा कर्णे यांची निवड झाल्याने सर्व स्तरातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

2 comments:

  1. I'm regularly watching gandhawarta to get update from my from home town which is 7 seas apart from my location .. this news is Good appreciate it. if you cover more things which make every connected to phaltan . like sharing the local pictures and enhancement. will attract more views

    also will suggest raise gandhawarta funds to uplift people in Phaltan with transparency will attract more views

    ReplyDelete
  2. thank you for your helpful suggestions...i will try my best to get your demands and thank you for watching us.

    ReplyDelete