पायी चालत जाऊन शंभू महादेवाला साखर अर्पण : आ. रणजितसिंह मोहिते पाटील व कुटुंबियांचा उपक्रम
![]() |
शंभू महादेवाला अभिषेक करताना आ. रणजितसिंह मोहिते पाटील व कुटुंबीय |
फलटण : श्री शंकर सहकारी साखर कारखाना लि., सदाशिवनगर, ता. माळशिरस या साखर कारखान्यामधून उत्पादित पहिल्या साखर पोत्यामधील साखर शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेव चरणी अर्पण केल्यानंतर, शंभू महादेवाला अभिषेक करुन, दर्शनासाठी कारखान्याचे चेअरमन आ. रणजितसिंह मोहिते पाटील व कुटुंबीय सदाशिवनगर येथून पायी शिखर शिंगणापूर येथे पोहोचले.
श्री शंकर सहकारी साखर कारखाना सुमारे ४ वर्षानंतर पुन्हा सुरु करण्यात आला असून माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील व सहकार महर्षी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि त्यानंतर पहिल्या ५ साखर पोत्यांचे पूजन नुकतेच समारंभपूर्वक करण्यात आले, त्यानंतर वरीलप्रमाणे चालत जाऊन साखर शंभू महादेव चरणी अर्पण करण्यात आली.
साखरेचा प्रसाद दाखविण्यासाठी आ. रणजितसिंह विजयसिंह मोहिते पाटील व सौ. सत्त्यप्रभादेवी रणजितसिंह मोहिते पाटील, अर्जूनसिंह मोहिते पाटील, सौ. वैष्णवीदेवी अर्जुनसिंह मोहिते पाटील, विश्वतेज रणजितसिंह मोहिते पाटील, अनिल जाधव, संजय राकले, आण्णा आरवे, राजू शेटे पायी चालत शंभू महादेवाला साखरेचा प्रसाद दाखविण्यासाठी पायी चालत शिखर शिंगणापूर येथे पोहोचले.
No comments