Breaking News

सातारा येथे तृतियपंथीयांसाठी कायदेविषयक जागरुकता शिबीर संपन्न

Legal awareness camp held at Satara

         सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,सातारा, क्षितीज बहुउद्देशीय सामाजिक संस्था, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क, जकातवाडी व निर्माण बहुउद्देशीय विकास संस्था, पुणे आणि संग्राम संस्था कराड यांच्या सयुक्त विद्यमाने सातारा येथील राधिका हॉटेल येथील सभागृहात तृतियपंथीयांसाठी कायदे विषयक समस्या व उपाय जागरुकता शिबीर घेण्यात आले होते.

                या कायदे शिबीरास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तृप्ती जाधव, वरीष्ठ दिवानी न्यायाधीश नितीन जाधव, ॲङ दिलशाद मुजावर, प्रा. जीवन बोराटे यांच्यासह तृतियपंथी उपस्थित होते.

वरीष्ठ दिवाणी न्यायाधीश नितीन जाधव यांनी तृतियपंथीयांचे संरक्षण कायदा अस्तित्वात आल्याचे व त्याद्वारे त्यांचे हक्क मिळण्याकरिता काय करावे या विषयी माहिती दिली.

                यावेळी ॲङ दिलशाद मुजावर यांनी   तृतियपंथीयांना त्यांच्या विषयी असलेल्या घटनात्मक अधिकारी, शासनाच्या वतीने तरतुदी व कायदेशीर मिळणाऱ्या सुविधांची माहिती दिली.

No comments