Breaking News

तृतीय पंथीयांच्या अडीअडचणी सोडविण्याबाबत जिल्हास्तरीय समिती बैठक संपन्न

District level committee meeting held to solve the problems of Third Gender

        सातारा दि. 23 (जि.मा.का.):    जिल्हयात तृतीय पंथीय कल्याणासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.  समिती स्थापन करून तृतीय पंथीयांच्या समस्या सोडविण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सुचना अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी केल्या

तृतीय पंथी यांच्या समस्येबाबत नुकतीच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक अपर जिल्हाधिकारी श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे उपस्थित होते.

     तृतीय पंथीयांच्या आधार कार्ड,रेशनिंग कार्ड या सारख्या मुलभुत बाबींसाठी संबधित प्रांत, तहसिलदार यांना सुचना देवून दाखले उपलब्ध करून देण्याबाबत कळविण्यात येईल, असे सांगितले तसेच वैदयकीय अडीअडचणी, राहण्याच्या अडचणी (निवास) सोडविण्याबाबत  सकारात्मता दाखवली. 

                सहायक आयुक्त श्री.  उबाळे यांनी तृतीयपंथीयांचे सर्वेक्षण पुर्ण करून शासनाच्या वतीने येणाऱ्या योजनांचा लाभ देण्याचे 100 टक्के प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

No comments