Breaking News

आमचे महाराज रामराजे महाराष्ट्राची आहे शान... गिताचा लोकार्पण सोहळा संपन्न

आमचे महाराज रामराजे...  गिताचे  लोकार्पण करताना आमदार दिपक चव्हाण, गायक शेखर गायकवाड, भिमदेव बुरुंगले सर, आयोजक जय रणदिवे व इतर

Aamache Maharaj Ramraje song has been released and Dedication

        गंधवार्ता वृत्तसेवा, फलटण - विधानपरिषदेचे सभापती  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावरील गीताचे ऑडिओ, व्हीडिओ लोकार्पण सोहळा काल दि. 22 फेब्रुवारी रोजी  फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण  यांच्या हस्ते  संपन्न झाला. यावेळी मुळशी पॅटर्न फेम, बड्डे आहे भावाचा या गिताचे  व आमचे महाराज रामराजे महाराष्ट्राची आहे शान.. गीताचे गायक शेखर गायकवाड उपस्थित होते.

        आमदार दिपक चव्हाण यांनी ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वरील गिताचे लोकार्पण करून प्रकाशन झाले असे जाहीर करून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याविषयी माहिती दिली. 

        गीत लोकार्पण कार्यक्रमा प्रसंगी डीजे सिस्टीम वर लोकार्पण केलेल्या गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमास भिमदेव बुरुंगले सर, बादशहा भाई सामाजिक कार्यकर्ते मुंबई, जमिरभाई शेख सामाजिक कार्यकर्ते फलटण, विकास काकडे सर, हर्षल लोंढे आदी मान्यवर उपस्थितीत होते.

    कार्यक्रमाचे आयोजक व संकल्पक जय रणदिवे यांचा श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान च्या वतीने सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अमोल आढाव सर यांनी केले. आभार श्याम अहिवळे यांनी मानले.

No comments