विडणी येथिल शरद आदलिंगे यांचे 'गोल्ड २३' गव्हाचे पिक सर्वोत्कृष्ट
![]() |
शरद आदलिंगे यांना सन्मानित करताना डॉ.बाळासाहेब शेंडे व इतर मान्यवर |
फलटण - फलटण तालुक्यातील विडणी येथील शेतकरी शरद बाबासो आदलिंगे यांच्या 'गोल्ड २३' या वाणाच्या गव्हाचे पिक सर्वोत्कृष्ट म्हणून निवड झाल्याने त्यांना ग्रीन गोल्ड सिडस कंपनीच्यावतीने विडणी येथे ट्राँफी देऊन सत्कार करण्यात आला.
विडणी ता.फलटण येथे ग्रीन गोल्ड सिडस् कंपनी, औरंगाबाद यांच्या वतीने पिक पाहणी व शेतकर्यांशी चर्चा सत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे, संजय अभंग, सुरेश भाऊ शेंडे, डॉ.अरुण अभंग, अनिल अभंग, सोनबा आदलिंगे, उत्तम आदलिंगे, ज्ञानेश्वर आदलिंगे, आर.एम.व्होरा, सी.पी.दोशी, संदीप खेसे, गणेश होळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
ग्रीन गोल्ड सिडस कंपनी औरंगाबाद या कंपनीच्यावतीने 'गोल्ड २३' या वाणाच्या गव्हाच्या पिकांची पाहणी दौरा करण्यात आला होता. यामध्ये विडणी येथिल शेतकरी शरद बाबासो आदलिंगे यांच्या 'गोल्ड २३' या वाणाच्या गव्हाच्या पिकाची सर्वोत्कृष्ट म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी शरद आदलिंगे यांना श्रीराम साखर कारखान्याचे चेअरमन डॉ.बाळासाहेब शेंडे यांच्या हस्ते ट्राँफी देऊन सन्मानित करणेत आले.
No comments