Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतली कोरोनाची लस

Prime Minister Narendra Modi took the corona vaccine

गंधवार्ता वृत्तसेवा दि. 1 मार्च 2021 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या एम्स रुग्णालयात कोरोना लस टोचून घेतली. पंतप्रधान मोदी यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून लसीकरणाची माहिती दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लसीकरण झाल्यानंतर ट्विटररवर ट्विट करून सांगितले की, 'कोरोनाविरुद्ध या वैश्विक लढाईत आपल्या डॉक्टर्स आणि वैज्ञानिकांनी सर्वोत्तम काम केले आहे. कोरोना लस घेण्यासाठी पात्र असलेल्या व्यक्तींना मी लसीकरणासाठी येण्याचे आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाला कोरोनामुक्त करूयात'

कोविड-१९ लसीकरणाचा तिसरा टप्पा आज १ मार्चपासून सुरू होत असून ६० वर्षे पूर्ण केलेले तसेच ४५ वर्षांवरील आजारी लोकांना या टप्प्यात प्राधान्यक्रमाने लस दिली जाणार आहे. 


No comments