Breaking News

डिसेंबर अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करावे

Quarterly Statement ER-1 for the end of December should be submitted online

        सातारा (जि.मा.का.) : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय  तसेच  खासगी  कार्यालय  यांनी डिसेंबर 2020 अखेरचे ई आर-1 तिमाही  विवरणपत्र   कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या संकेतस्थ्ळावर ऑनलाईन पध्दतीने सादर करावे,असे  आवाहन  कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्राचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांनी केले.

        ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड या कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. जाधव यांनी केले आहे.

No comments