Breaking News

सातारा येथील जीएसटी भवन कार्यालयाचे उद्घाटन

जीएसटी भवन च्या नूतन नी करण कार्यालयाचे उद्घाटन सोहळ्याप्रसंगी श्रीमती कृष्णा मिश्रा .विमलेश कुमार सिंह ,पराग सिंह वैशाली पतंगे व इतर मान्यवर

        Inauguration of GST Bhavan office at Satara

         सातारा - येथील केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या इमारतीचे नूतनीकरण नुकतेच करण्यात आले जीएसटी भवन या कार्यालयाचे उद्घाटन नुकतेच पुणे येथील सीमा शुल्क व केंद्रीय वस्तू व सेवा कर कार्यालयाच्या मुख्य आयुक्तश्रीमती कृष्णा मिश्रा यांचे शुभ हस्ते फलक अनावरण करून करण्यात आले याच कार्यक्रमात कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेल्या निवासस्थानाचे नूतनीकरण आणि संपन्न झाले तसेच याही वास्तूचे उद्घाटन मोठ्या उत्साहात झाले नूतनीकरण करण्यात आलेल्या कार्यालयाची पाहणी यावेळी मुख्य आयुक्त व उपस्थित प्रमुख पाहुण्यांनी केली आणि या कामाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच अतिशय दर्जेदार अशा या नूतनीकरणाच्या मुळे एक चांगली वास्तु प्रशासकीय सेवेत सादर झाल्याबद्दल केंद्रिय जएसटी सातारा मंडल चे उपायुक्त विमलेश कुमार सिंग यांचे अभिनंदन केले.

        या कार्यक्रमास व्ही एन थेटे आयुक्त केंद्रीय जीएसटी कोल्हापूर पुणे येथील संयुक्त आयुक्त पराग सिंह कोल्हापूर येथील संयुक्त आयुक्त श्रीमती वैशाली पतंगे तसेच सातारा येथील सनदी लेखापाल श्री व सौ प्रफुल्ल शहा उपस्थित होते.

No comments