गांजा तस्करी : 4 किलो 628 ग्रॅम गांजा वाहतूक करताना एकास अटक
फलटण दि. 24 जानेवारी 2021 ( गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण लोणंद रोड वर जिंती नाका येथे, गांजाची वाहतूक करणाऱ्या दुचाकीस्वाराला फलटण शहर पोलीसांनी, ताब्यात घेतले असून त्याच्याकडे 4 किलो 628 ग्रॅम वजनाचा गांजा सापडला आहे. गांजा व इतर मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दुचाकीस्वारास पोलिसांनी अटक केली आहे.
फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, लोणंद ते फलटण जाणारे डांबरी रोडवर जिंती नाका येथे दिनांक. 24 जानेवारी 2021 रोजीची सकाळी ०९.०० वाजण्याचे सुमारास फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किंद्रे, स.पो.नि. गायकवाड, स.पो.फौ. भोईटे, पो.हवा.ठाकुर पो.ना.लावंड पो.ना.सुळ, पो.कॉ मेंगावडे असे पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे कामगिरीवर रवाना होवुन, जिंती नाका येथे १०.३० वा.च्या सुमारास हजर असताना, एक इसम संशयीतरित्या होंडा शाईन मोटार सायकल क्रमांक-एम.एच.११ सी.वाय ४०७६ हिचेवरुन लोणंद बाजुकडुन जिंती नाका फलटण येथून चालला होता, पोलीसांना त्याचा संशय आल्याने, त्याला थांबवुन त्याचे नाव व पत्ता विचारले असता, त्याने त्याचे नाव युवराज बाळु मोरे वय. ३२ वर्षे रा. कुंभारगल्ली, मलठण ता. फलटण जि. सातारा असे सांगितले. सदर इसम हा बेकायदेशीर गांजा कब्जात ठेवुन वाहतुक करीत असल्याची खात्री झाल्याने, सदरवेळी पंचांच्या समक्ष मोरे याची अंगझडती घेतली असता, त्याचेकडील पांढऱ्या पिशवीमध्ये १२,३०० /- रुपये किंमतीचा ४ किलो ६२८ ग्रॅम वजानाचा गांजा सापडला. पोलीसांनी गांजा तसेच मोटार सायकल, रोख रक्कम, मोबाईल हॅण्डसेट व इतर साहित्य असा एकुण ६५,७५० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असुन, आरोपीचे विरुध्द गुंगीकारक औषधीद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदिप बनकर हे करीत आहेत. सदर गुन्हयाचे तपासकामी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई अजयकुमार बन्सल पोलीस अधिक्षक, सातारा, धिरज पाटील अपर पोलीस अधिक्षक सातारा, तानाजी बरडे, उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग फलटण यांच्या मार्गदर्शनाखाली, भारत किंद्रे पोलीस निरीक्षक फलटण शहर पोलीस स्टेशन, सपोनि एन.आर. गायकवाड, सपोर्फी भोईटे,पो.हवा.१६७० ठाकुर,पो.ना.४२० लावंड, पो.ना.२२६० सुळ, पो.ना.४७३ भोसले, पो.ना.२२५४ बोडरे,पो.कॉ.५९२ में गावडे, पो.कॉ.३९३ तांबे यांनी केलेली आहे.


No comments