Breaking News

दुचाकीस्वारास चाकुचा धाक दाखवून मोबाईलची चोरी

Mobile phone theft by showing fear of knife to two-wheeler rider

        फलटण 24 जानेवारी 2021 (गंधवार्ता वृत्तसेवा) -  बारामतीहुन फलटणला येणाऱ्या दुचाकीस्वारास सोमवार पेठ, फलटण येथील पेट्रोल पंपाजवळ, एकाने चाकूचा धाक दाखवून, त्याच्याकडील मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला.

        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 16 जानेवारी 2021 रोजी संध्याकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास  सोमवार पेठ फलटण पेट्रोल पंपाच्या पाठीमागे बारामती रोडवर, बारामतीवरून फलटणला येणाऱ्या रमेश रामचंद्र शिंदे वय 43 राहणार बिरदेव नगर जाधववाडी ता. फलटण जि. सातारा यांना पेट्रोल पपांच्या मागे, बारामती रोड, सोमवार पेठे फलटण येथे,  टीव्हीएस स्टार सिटी मोटरसायकलवरून एक वय अंदाजे 19 ते 20 वयोगटातील अनोळखी मुलगा तोंडाला मास्क व चेहऱ्याला स्कार्फ बांधलेला होता. त्याच्या उजव्या हाताचे मनगट ते कोपराच्या मध्ये बाहेरील बाजूस इंग्रजीमध्ये TUSHAR असे गोंदलेल्या होते. त्याने रमेश शिंदे यांना त्याच्या हातातील चाकूचा धाक दाखवून एक पर्पल कलरचा 10 हजार रुओये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला असल्याची तक्रार रमेश रामचंद्र शिंदे यांनी दिली आहे.

        अधिक तपास स. पो. नि. गायकवाड साहेब हे करीत आहे.

No comments