कोणताही बांधकाम कामगार योजनेपासून वंचित राहू नये - माधुरी कुंभार
![]() |
फरांदवाडी येथे बांधकाम कामगारांना मार्गदर्शन करताना माधुरी कुंभार |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून दिल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ फलटण तालुक्यातील बांधकाम कामगारांनी घ्यावा तसेच कोणताही बांधकाम कामगार योजनेपासून वंचित राहू नये असे आवाहन सातारा जिल्हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या उपजिल्हा कार्यकारी अधिकारी श्रीमती माधुरी कुंभार यांनी केले.
फरांदवाडी ता. फलटण येथील मयुरेश्वर मंगल कार्यालय येथे आयोजीत कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी सुविधाकार तथा नोंदणी अधिकारी दत्तात्रय जाधव , काॅन्ट्रक्टर राजीव नाईक निंबाळकर , किरण दंडिले , अनिल शिपकुले , राहुल अटक, हेमंत जाधव, सौ साधना कुंभार, साधना सागर, भागश्री कोळेकर, आश्लेषा कांबळे, अश्विनी सरकाळे, महादेव कुंभार, सोमनाथ बोडरे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्रीमती कुंभार म्हणाल्या की , बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना बांधकाम कामगार मंडळाकडून विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येत आहेत.यामध्ये मुलांचे शिक्षण , विवाहासाठी खर्च, महिलांना बाळंतपणाचा खर्च याचा समावेश यामध्ये होतो . सध्या शासनाकडून ही योजना ऑनलाईन करण्यात आली आहे. त्यासाठी आधार कार्डला मोबाईल नंबरची जोडणी करून घेणे आवश्यक आहे. तसेच कोरोना कालावधीत कामगारांना काम नसल्याने आर्थिक अडचण निर्माण झाल्याने कोरोना मदत बांधकाम मंडळाकडून कामगारांना दिली जाणार आहे. बांधकाम कामगारांसाठी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी बांधकाम कामगारांची महाराष्ट्र शासन लिंक वर्कर व सेवा संस्था सातारा याच्या मार्फत एच आय व्ही तपासणी करण्यात आली.
यावेळी फलटण बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष शांताराम कारंडे, शिवाजी कचरे, रमेश भंडारे, सचिव संजय शिंदे, भानुदास नाळे, रामदास शेंडे, संतोष कर्णे, दिलीप नामदास, सोमनाथ शिंदे, तेजस लोणकर यांनी परिश्रम घेतले.
No comments