Breaking News

मोटार सायकल चोरटयांना अटक ; बारामती शहर पोलीसांची कारवाई

Motorcycle thieves arrested; Baramati city police action

        बारामती दि. 29 डिसेंबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोटार सायकल चोरीचे वाढते प्रमाण पाहुन, त्या अनुषंगाने डॉ. अभिनव देशमुख सो पोलीस अधिक्षक पुणे ग्रामीण यांचे सुचने प्रमाणे, सर्व पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हे उघडकीस आनण्याच्या दृष्टीने सुचना देण्यात आल्या होत्या. त्या प्रमाणे बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीत मोतीबागचौक, इंदापुर रोड येथे नाकाबंदी करण्यात आली होती. त्या दरम्यान मोतीबागचौक येथे दोन इसम बुलेट मोटार सायकलवर संशयीत रित्या फिरताना दिसले. पोलीस स्टाफ ने त्यांना थांबवुन बुलेट मोटार साकयलचे कागदपत्रा बाबत खातर जाम केली असता, त्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने त्यांना अधिक चौकशी कामी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे आणून त्यांचे नाव व पत्ते विवारता, त्यांनी त्यांची नावे १) चैतन्य पांडुरंग शेळके वय १९ वर्षे २) किशोर सहदेव पवार वय १९ वर्षे दोन्ही रा.भोत्रा ता.परांडा जि.उस्मानाबाद असे असल्यावे सांगितले त्यांना अधिक विश्वासात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता, त्यांनी त्यांचे जवळील बुलेट मोटार सायकल दिनांक २४/१२/२०२० रोजी कसबा बारामती येथुन चोरी केले बाबत सांगितले. त्यांना आणखी  विश्वसात घेवुन तपास करीत असताना त्यांनी,  आष्टी पोलीस स्टेशन जि. बीड , बारामती तालुका पोलीस स्टेशन, हददीतुन मोटार सायकल चोरल्याचे सांगितले. त्या अनुशंगाने त्यांचेकडुन एकुण पाच मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या असुन, बारामती शहर पोलीस स्टेशनचे २ गुन्हे, बारामती तालुका पोलीस स्टेशनचा १ गुन्हा, आष्टी पोलीस स्टेशनचा १ गुन्हा, तसेच त्यामधील बजाज कंपीचे पल्सर मोटारचा अधिक तपास चालु आहे अशा प्रकारे वरील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणाले असुन त्यांचेकडुन एकुण ४,३५,०००/- रु किंमतीचा मुददेमाल हस्तगत करण्यात आला आहे.

        सदरची कामगीरी मा. पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख सो, मा. अष्पर पोलीस अधिक्षक श्री. मिलींद मोहीते सो, मा. श्री. नारायण शिरगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती विभाग बारामती, पोलीस निरीक्षक नामदेवराव शिंदे, यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे सहा. पो. उपनिरीक्षक संजय जगदाळे, पोलीस हवा. अनिल सातपुते, भगवान दुधे, पोलीस नाईक दादासाहेब डोईफोडे,रूपेश साढुंके, पो.का सुहास लाटणे बंडु कोठे, योगेश कुलकर्णी, दशरथ इंगोले, अकबर शेख, अजित राउत, होमगार्ड निलेश खामगढ, नवनाथ झगडे, अक्षय जगदाळे, यांनी कामगिरी केली असुन सदर गुन्हयाचा तपास पोलीस नाईक ओंकार सिताप हे करीत आहेत.

No comments