Breaking News

खंडाळ्यातील लॉजवर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा 6 महिलांची सुटका, 7 जणांना अटक

Local Crime Branch raids lodge in Khandala, 6 women rescued, 7 arrested

    सातारा दिनांक 14 प्रतिनिधीपुणे बेंगलोर महामार्गावर खंडाळा गावाच्या हद्दीत केसुरी फाट्याच्या उड्डाणपूला लगत असणाऱ्या मोनिका लॉजवर कुंटणखाना चालवणाऱ्या सात इसमांना स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून ताब्यात घेतले आहे या कारवाईमध्ये सहा महिलांची सुटका करण्यात आली आहे या कारवाईमुळे खंडाळा परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

    कुंटणखाना चालवणाऱ्या सहा जणांमध्ये राहुल वसंता शृंगारे स्टार सिटी शिरवळ तालुका खंडाळा रावेत शेट्टी,मोहम्मद जावेद अख्तर,दत्ता राजू देवकर,हरीश वासुदेव शेट्टी , शुभम आप्पासो घुले ,रंजन कुमार लक्ष्मण मलिक सर्व राहणार मोनाली लॉज पारगाव खंडाळायांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांना गोपनीय बातमीदारामार्फत खंडाळा गावाच्या हद्दीत सातारा पुणे महामार्ग लगतच्या एका लॉजवर कुंटणखाना चालवला जात असल्याची माहिती प्राप्त झाली होती त्याप्रमाणे त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अधिक तपासासाठी प्राचारण केले .स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पथक तत्काळ घटनास्थळी पाठवले सहायक पोलीस निरीक्षक केके मस्के महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील पोलिस अमलदार रामचंद्र गुरव संजय शिर्के शरद बेबले प्रवीण फडतरे विक्रम पिसाळ रविराज वर्णेकर मोना निकम अधिका-विहीर अनुराधा सणस या पथकाने घटनास्थळावर जाऊन तेथे छापा मारला लॉजवरून सहा महिलांची सुटका करण्यात आली .मानवी अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम चार व पाच नुसार संबंधित सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    या कारवाईमध्ये तृप्ती शिंदे शहनाचे खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस आमदार अमोल दिघे राहुल चव्हाण नेवसे यांनी या कारवाईत भाग घेतला होता या कारवाईचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी अभिनंदन केले आहे.

No comments