Breaking News

फलटण तालुक्यात ३३ ग्रामपंचायतींसाठी १७३ उमेदवारी अर्ज दाखल

 
173 nominations filed for 33 Gram Panchayats in Phaltan taluka
         फलटण दि. 29 : ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी आज (सोमवार) ३३ ग्रामपंचायतींसाठी १७३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती नायब तहसीलदार रमेश पाटील यांनी दिली आहे.
     ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीसाठी दि. २३ ते ३० डिसेंबर अखेर उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे असून दि. २३ व २४ डिसेंबर रोजी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही, तर दि. २५, २६ व २७ डिसेंबर रोजी सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल झाले नाहीत.फलटण तालुक्यात ८० ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूका जाहीर झाल्या आहेत.
 आज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जामध्ये गावे व त्यापुढे दाखल उमेदवारी अर्जांची संख्या खालीलप्रमाणे आहे. 
      राजुरी ११, बिबी ९, घाडगेवाडी ११, धुळदेव ४, सांगवी ८, कांबळेश्वर ३, निरगुडी ७, सासकल १, सोनवडी बु|| १, सोनवडी खु|| २, रावडी बु|| २, पिंपळवाडी ९, काळज १, फडतरवाडी ३, कोळकी १०, जाधववाडी फ ५, झिरपवाडी १, निंभोरे ८, वडजल ९, सस्तेवाडी ७, खुंटे १, शिंदेवाडी ३, फरांदवाडी १, मुंजवडी ११, नांदल २, वाखरी ६, मलवडी ६, साठे ७, शिंदेनगर १, निंबळक १२, जावली ५, आंदरुड ५, शेरेशिंदेवाडी १.


No comments